Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajan Gawali

Inspirational

4  

Rajan Gawali

Inspirational

मी परत येणार आहे

मी परत येणार आहे

1 min
14K


तुझ्या नाळेशी जडला श्वास

तसा ह्या मातीशी जडला आहे

तू वाढवले मज दूध तुझे पाजून

ऋण देशाच्या मातीचे शीरी

रक्षणासत्व सीमेवर वर्षाव

गोळ्यांचा थोपवतो

तुझी ओढ ममता प्रेमासाठी

मृत्यूला ही मागे सारणार आहे

आई.... मी परत येणार आहे....


जाणीव मजला आहे

मी काठी तुमच्या उतारवयाची

तुम्ही झिजवला देह चंदनापरी

म्हणून आज माझ्या जीवनी गंध आहे

रात्र दिवस तुमची धडपड

आमच्यासाठी काबाडकष्ट

दुःख पचवून डोंगराचे

हास्य तुमच्या मुखावर आहे

बाबा.....मी परत येणार आहे.....


सये पूस आसवे लोचनाचे

कुंकू भक्कम तुझ्या भाळाचे

वचन माझे आहे तुला

साथ देणार शेवट पर्यंत

तुझ्या आसवांचा बांध नको बांधू

अन नयनातील पूराने मज नको थांबवू

आठवतो तुझ्या बाहुतला हर एक क्षण

अन लेकरात रमते सखे मन,आवर मनाला घालून

कर्तव्य महत्वाचे मज

तुझ्या सोबत नाते ह्रदयाचे

माझे नाते देशाशी श्वासाचे रक्ताचे

तुझे कुंकू मला तारणारे आहे


सखे.....मी परत येणार आहे.....


ह्या मातीचे उपकार थोर

खेळलो बागडलो इथेच घडलो

ह्या मातीसाठी बेहत्तर रक्त सांडणे

गारद दुश्मनाला करणे

मातीचा हा टिळा भाळी

तिरंग्याची आण घेऊनी

विश्व विजेता देश माझा

मुकुटमणी जगती साजा

माझा देश सशक्त आहे

मी ....परत येणार आहे....

मी.....परत येणार आहे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational