ऐतिहासिक भीमा कोरेगाव युद्ध..
ऐतिहासिक भीमा कोरेगाव युद्ध..
पेशवाईचा होता तो काळ
त्यात इंग्रजांनी ठोकला तळ
उच्च नीचतेचे विखारी निखारे
होता अस्पृश्याचा छळ
वाहत होते जाती धर्मांचे वारे
गळ्यात मडके कंबरेला झाडू
पाण्याला महारांना होती बंदी
बांधली कर्मठांनी धर्माची तटबंदी
त्याच दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीने
त्या गोऱ्या इंग्रजाने दिली महारांना संधी
येण्या त्यांच्या लष्करा मंदी
इंग्रजांनी आखला डाव
पेशवाईचे मिटवण्या नाव
पुण्यावर करण्या घाव
सत्ता वाढविण्याची हाव
सिद्धनाक महाराने ओळखला कावा
घेतली पुण्याकडे धावा
प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावकडे ठेवला
लढतो इंग्रजांविरुद्ध तुमच्या बाजूला
अट आमची माणसाचा हक्क द्या आम्हाला
छत्रपती शिवाजीचे आम्ही मावळा
ह्या महाराष्ट्राच्या मातीचा आम्हा कळवळा....
ऐकताच दुसरा बाजीराव कडाडला
रागाने लालेलाल झाला भडकला
नीच महारांना पेशवाईत नाही स्थान
नाही तुम्हाला इथे मान
नको पंगतीला आमच्या घाण
तुम्ही तर पायातील वहाण
तुमची नाही आम्हा गरज
लढू इंग्रजांशी गेला जरी प्राण.....
सिद्धनाक महाराच्या ऊरात भडकली आग
घेऊन डोळ्यात राग
जखमी चवताळला तो वाघ
वदला घेणार अपमानाचा सूड
करीन दुसऱ्या बाजीरावाचे
मुंडक्या पासून वेगळे धड
हातात घेऊन तलवार
सज्ज झाला सिद्धनाक सरदार
300 इंग्रजी सैनिक सांगे 500 महार
पेशव्यांचे सैनिक 28 हजार
1 जानेवारी 1818 चा दिवस
भीमा कोरेगाव भीमा नदी काठावर
वेळ सकाळ अंगात युद्धाच वार
तलवारीला चढली ती धार
त्वेषाने लढला तो महार
एक एकाने केले छप्पन ते ठार
गेला तो बाजीराव हादरून
तहान भूक विसरून ते लढले
रक्ताने पाणी भीमा नदीचे लाल झाले
बाजीरावाला हैराण केले
इतिहासात पाचशे महार महान झाले
दुसरा बाजीराव तो हरला
पेशवाईचा अस्त हो झाला
इतिहास भारतात घडला
ऐतिहासिक विजय तो मिळवला
जाणून महारांचा पराक्रम तो
उभारला 1851 ला विजयी स्तंभ तो
आरंभ झाला मानवतेचा तो
समानता बंधुता न्यायाचा तो
माणसाला माणसाचा हक्क मिळवण्याचा तो
आशा त्या ऐतिहासिक त्या दिनाला
पराक्रमी त्या शौर्याला
वंदन करतो कोटी कोटी
माणसातल्या माणुसकीला......
