STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

4  

Latika Choudhary

Inspirational

झाड अन माणूस

झाड अन माणूस

1 min
44.8K


 तो बघा ध्यानस्त वृक्ष अन् त्याची

  हिरवीकंच पर्णशाखा

   काळसाक्ष होत रुजलाय 

    मातीत..मनात..

     धरणीच्या..आभाळाच्या.. 

      माणसाच्या..'बाईच्याही'..! कारण--

 तो जाणतो सृजनकळा...प्रसवयातना

 'बी'अन् 'बाई'च्या...की

 'ती'ला रुजावं ..बुजावं.. शिजावं..  

  निजावं लागतं मातीत अन्'बी'तून

  'ती'तुन अंकुरतो 'तो' वृक्ष !

   सोसतोय तोही तसा ऊन.. वारा..

    पाऊस..झळा उन्हाच्या देण्या 

    सावूली माय बनून,अन् आधार 

     होऊन बाप वाटसरुचा ...!

 हिरवीकंच पर्णशाखा...यौवनात 

 झुलणारी पाने जन्मताहेत... 

  जगताहेत.. नाचताहेत ...

  पक्षांसवे ...पिलांसवे ...काळासवे...

   हळूहळू...हळूहळू ..हळूहळू.....!

   निर्मित..जन्मलेले प्रत्येक जीवन...

    जगणे करत राहते प्रवास

    पक्वतेकडे ..मुक्ततेकडे.. देहाच्या

     ...विलीन होण्यासाठी....

! आयुष्याच्ं वर्तुळ पूर्ण होत आलं हे

 दर्शविणारा गळतीचा काळ..  

  संन्यास आश्रमाकडे  

   खुणवत राहतो पानाला...मनाला-

   झाडाच्या...माणसाच्या...!

 जीवनाच्या अन् झाडाच्या 

  फांदीवरून गळणारी पाने...मने

   देता देता निरोप....स्विकारत

    आरोप ...शिरतात कुशीत....

     मायच्या..मातीच्या

      संगे शिदोरी भूत वर्तमान.. 

        आनंद दुःख...  

         यश अपयशाची ...!

 पक्व,जीर्ण पानांचं गळणं. तुटणं

  साचणं थबकणं दाखवत राहतं

   हतबलता माय बापाची.

    का विसरतो माणूस त्याची 

     छाया.... माया ...कळा ..झळा

     सोसलेल्या तनाच्या ..मनाच्या

     ,..जीन्या जगण्याच्या...?

का करतो डोळेझांक?

ती पक्व सोनेरी ..पिवळी .. कष्टाळूमातकट..

  हळवी, जगण्याची, जगवण्याची 

  सुंदर अनुभूतीची श्रीमंती अंगावर

   लेवून पुन्हा पुन्हा जीवाची माती

   करीत मातीतच खपणारी पाने 

     त्यांना त्यांचे भविष्य सांगत

      आहेत ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational