शोध घे अस्तित्वाचा
शोध घे अस्तित्वाचा


कुठंवर मांडतेस व्यथा
कुणाला सांगतेस कथा
सरवा तुझ्या आयुष्याचा
वेचावा लागेल स्वत:
निर्मळ पविञ सरिता ही
पाप पुण्याचे ओझे घेऊन वाहतेना
नाजुकशा त्या वेलीवर
फळांचा भार तू पाहतेना
चिखलातील कमळ
बीजांकुरालाही
ठाऊक असतं जीणं
संकटास झुंजला नाही
जगी थोर असं कोणं
जग निर्मीती तू उदरातल्या
पान्हाने करते जीवांचे पोषण
षंढ आभाळाच्या लहरीने
होऊ देऊ नकोस तुझे शोषण
पु
ञ घेऊन पाठीशी लढली पण
झाशीची राणी झुकली नाही
चिखलशेणाचे खाऊन गोळे
साविञी कधी चुकली नाही
शोध घे अस्तित्वाचा सखे
हा जन्म नसतो ग पुन्हा
उंबरफुल दिसले नाही
हा थोडाच तुझा गुन्हा
हाक दे क्षितीजावरी
ऎकू येईल तूला गाणे
तूच शब्दबध्द केलेले
सखे अंतरंगाचे तर्हाने
सबला आहेस तू ग
स्वाभीमान तुझ्या ठाई
जिंकलेस जग सारे आता
सरव्यासाठी लाचारी
पत्करायची नाही