जन्मलास नाव जात धर्माशिवाय
जन्मलास नाव जात धर्माशिवाय
1 min
21.5K
नारायणा, सुर्याचे तेज घेऊन जन्मलास
जन्मलास नाव जात धर्माशिवाय
गंगारामानं तुला रस्त्यावरून उचललं नि काशीबाईच्या कुशीत ठेवलं...
सुर्वे त्यांचे च नाव घेऊन साहित्याचा सुर्य झालास....
कधी कपबश्या विसळल्यास कधी घरगडी
झालास
भाकरीचा चंद्र शोधता शोधता गिरणी कामगार झालास
कधी हमाली केलीस तर कधी कारखान्यात पत्रे उचललीस
महापालिकेच्या शाळेत शिपाई नि त्याच शाळेत
सुर्वे मास्तर झालात
शोषितांचे,कामगारांचे दुःख मांडत शब्द शब्द
गुंफला
नि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालात
अनाथांचा नाथ होऊन साहित्याचा लख्ख प्रकाश पडला
तेव्हा आकाश ठेंगणे झाले कामगारांचा उर भरून आला
आज तुमचा कामगार कष्टाने देश सम्रुद्ध करतोय
साहित्य संस्कृतीचा तो पाईक बनतोय
शब्दांनी साहित्य सम्रुद्ध करतोय
नारायणा नित्य तो तुला प्रणाम करतोय...