STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

जनरेशन गॅप...!

जनरेशन गॅप...!

2 mins
17.3K


जनरेशन गॅप

जनरेशन गॅप हे काय

आम्हाला काही कळाल नाही

कारण गॅप हा प्रकार

कधी आम्ही अनुभवलाच नाही


पंचवीस तीस वर्षांचा गॅप

हा तसा काही लहान नाही

पण तसा इतका म्हणावा

तितका मोठा पण नाही


विचार केला मी जरा

झाली का काही कोठे त्वरा

पण तसं काही मला वाटलं नाही

कारण ग्यापचं फ्याड मला पटलं नाही


क्षणा क्षणांचा सहवास घडला

पाया संस्काराचा कधी

आडवा नाही पडला

मग हा प्रताप कसा घडला..?


उत्तर शोधण्या मी आत शिरलो

शिरता शिरता पुरता वीरलो

प्रयत्नांना पुरून उरलो

मग कोठे भानावर आलो


कळाल मला गणित कोठे चुकलं

हुकमी एक्याच पान कुठं खपल

सावरलं स्वतःला आणि मी ला जपलं

म्हंटल आहे ते शेवटी लेकरू आपलं


डोळे उघडायची वेळ आली दाराशी

कवटाळु किती आता उराशी

झेप घेऊ पाहतात आकाशी जराशी

वाटणारच त्यांना भेळ जरा खावीशी


अडवलं नाही मी कधी कुणाला

चुकलो नाही मी माझ्या पणाला

पण चीर कशी पडली कण्याला

जागा कशी झाली मग दोष देण्याला


हाच ग्याप हा विचारांचा असणार

कदाचित संगतीचा परिणाम असणार

किंव्हा दोष माझ्या पालनाचा असणार

नाहीतर तो माझ्याच संस्काराचा असणार


शांत झाले मन वावटळ निघून गेली

चूक मला कळाली

खाजगी जीवनाची सुरुवात झाली

आमची जबाबदारी क्षणात निमाली


भाषेवरचा ताबा सुटला

मोकळे पणावर पडदा पडला

प्रवास माझा असा घडला

स्वप्न पाहण्याचाच मी नाद सोडला


वाटलं होतं जे मला नाही जमलं

ते मुलांना माझ्या जमेल

जिद्दीच्या जीवनाला माझ्या

उतुंग यशाची झळाळी मिळेल


पण तसं काही या क्षणी

घडेल अस मला वाटत नाही

माझ्या स्वप्नांना मूर्त रूप मिळेल

अस काही घाटत नाही


तरी पण मी माझ्या स्वप्नांवर प्रेम करणार

हजारो हातांनी ती स्वप्न साकारणार

जनरेशन गॅपचं भूत गाडाणार

एक नवा इतिहास घडवणार....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational