शांत शांत...!
शांत शांत...!
अठ्ठावीस डिसेंबर 2023...!
शांत शांत...!
आज कसा रे शांत शांत
आहेस का रे निवांत
नाही गडबड, नाही गोंधळ
रीती आहे का रे ओंजळ....
कोठेच नाही रंगांची उधळण
कोठेच नाही ढगांची पखरण
निळ्या आकाशी उतरतो आहेस
करण्या का रे रात्रीची राखण..?