STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others Action

3  

Abasaheb Mhaske

Others Action

बस्स झालं आता ...

बस्स झालं आता ...

1 min
26.2K


बस्स झालं आता

स्वजातीचा दुराभिमान, सूर्य जातीला कमी लेखन 

नानाविध झेंड्यानि, जातीत माणसांना विभागणं 

विकासाचं नुसत्याच गप्पा मारणाऱ्या थापाड्याना निवडून देणं 

बस्स झालं आता

मनातल्या मनात कुढनं 

निरर्थक गोष्टीवर भांडण 

जातीपातीचे राजकारण करणं 

बस्स झालं आता

जातीचं भांडवल करून जातीसाठी माती खाणं

जातीपातीचे राजकारण करून सत्तेची पोळी भाजणं 

इस्टेटीसाठी बांधावरून  भावानं- भावाचं वैरी होणं 

बस्स झालं आता

दहशतीला शरण जाणं, कुत्र्यागत मरण - मारणं 

अन्याय, अत्याचार गप्पगुमान पाहत राहणं 

महापुरुष्याचे पुतळे उभारून, त्यांचीच विटंबना करणे 

बस्स झालं आता

खूप झालं दिशाहीन जिणं, चला गड्यानो! एक होऊ 

सर्वकंष क्रांतीची मशाल हाती घेऊ, स्वयंप्रकाशीत काजवा होऊ

फुले, शाहू, आंबेडकरांचे, बहुजन चळवळीचे पाईक होऊ 

 


Rate this content
Log in