Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Abasaheb Mhaske

Others


3  

Abasaheb Mhaske

Others


जिकडे - तिकडे धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा

1 min 174 1 min 174

जाळ कुठे तर धूर कुठे

खोटे -नाटे किती बोभाटे ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


महागाई बेकारी ना रोजीरोटी

तू तू मी मी, हमरी तुमरी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


मूठभर लोकांची मिरासदारी

लोकशाहीचा राजा सदैव भिकारी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


हा म्हणतो तू चोर ,तो म्हणतो तसाच

कळेचना कुणाला काय करावं, कस जगावं ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


ज्याच्या हाती ससा तोच पारधी

मरणाचेही भांडवल करणारे गारदी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


त्यांचेच झेंडे अन त्यांचेच दांडे

फोडा- फोडी झोडा -झोडी रात्रंदिनी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


मांणस उपाशी कुत्र्यांना मात्र

कशी बिस्किटांची न्याहारी ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


साचलेल्या डबक्यात डराव- डराव

हमारी बिल्ली , हमको म्याव ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


अंधभक्तांची फौज,संधिसाधुची मौज

आधाराची काठी कोण होणार? कधी?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


काहीही खपवतात देशभक्ती सांगून

छाताडावर नाचताहेत जाणून बुजून 

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


कुणाची काठी , कुणाच्या माथी

गरीबाचा वाली कुणी नाही

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


यांच्यातला चोर त्यांच्यात गेले

कळेचना कसे काय थोर झाले

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


संधीसाधू बगळे अन डोमकावळे

सगळेच कसे ठोसर भिकारी

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ओलांडली

लोकशाही कलंडली सांगा कोठे ?

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


उंदराला कशी मांजर साक्ष, लोणी वाटणी 

माकडांनो तुम्ही चालू द्या बिनधास्त

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


बाबांनो कधी कळणार आम्हाला ?

फसवणूक त्यांची लुटपाट बिनभोबाट 

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा


आता तरी जागे व्हा राजे हो

मोडीत काढा त्यांची ठोकशाही

धिंगाणा - धिंगाणा धिंगाणा

जिकडे - तिकडे धिंगाणा 


Rate this content
Log in