या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया
या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया
कुणी किंग जोन्स घ्या, कुणी ट्रम्प तात्या घ्या
कुणी हा घ्या कुणी तो तरी घ्या विश्व्गुरु पहा
सरकारी धोरण भांडवलदारांना शरण ..
अमीर रगडितो गरिबाला पायाखाली ते पहा ....
या बाळांनो या रे या ....नवी बघूया हि दुनिया
यांच्यातले चोर त्यांच्यात गेले... तरीही थोर झाले ...
समरसता , एकतेच्या नावाखाली वाट्टेल तिथे लोळले
गाडीभर पुरावे देत ज्यांना जेलमध्ये टाकले त्यांनाच
ज्येष्ठ श्रेष्ठ नेते म्हणतात मंत्रिपदाची बहाल केले ....
या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया
डावे उजवे बहुजन अभिजन सवर्ण दलित असं काही नसतं
खाणारे गाणारे देणारे घेणारे आणि पाठीशी घालणारे अन
आहे रे -नाहीरे ,शोषक - शोषित झगडाच तो हे एक उघड
बळी तो कान पिळी , ज्याच्या हाती ससा तोच पारधी असाच न्याय
या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया
देशभक्तांनो मरा तुम्ही श्रद्धान्जली वाहतो आम्ही निर्लज्जासारखे
तुम्ही उचला सतरंज्या द्या घोषणा जिंदाबाद , मुर्दाबाद उधळा फुले
तुम्ही आजन्म राहा कार्यकर्ते , आम्ही तुमचे श्रद्धास्थान आश्रयदाते
आम्ही खातो मलाई ,तुमची धुलाई ठरलेली ... घ्या केसेस डोक्यावर ....
या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया
संधीसाधू नेते , मुजोर भ्रष्टा प्रशासक वर्ग उदासीन जनता
चंदा द्या धंदा घ्या , नोकरी घ्या , वाट्टेल तितके कर्ज गया
रोजगारसेवक शिक्षणसेवक आरोग्यसेवक अग्नीवर फक्त तुम्ही
आम्ही बोके ,खोकेवाले तारणहार , तुम्ही चेले -चपाटे -पट्टेवाले
या बाळांनो या रे या ...नवी बघूया हि दुनिया