STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Action Inspirational

4  

vaishali vartak

Abstract Action Inspirational

क्षमा करु तयांना

क्षमा करु तयांना

1 min
349


केले संस्कार प्रेमाने

बालपणी आवर्जूनी

नको अती राग राग

 चूक घ्यावी समजूनी     


चुक ही होत असते

अढी नसावी मनात

मन हवे सदा मोठे

क्षमा करण्या क्षणात     


राहू आनंदी जीवनी

जन्म मिळाला मानव

लावू तयास सार्थकी

नाम घेऊया राघव     


 श्लोक मनाचे दासांचे

देती सहजची बोध

सुखी जगण्या जीवनी

घेउ त

याचाच शोध       


भुतकाळ विसरून

डाव नवीन मांडुया

कोरी करु मन-पाटी 

मोठ्या मनाने जगुया     


पराक्रमा संगे क्षमा

विद्या शोभे विनयाने

क्षमाशील होताचिया

रुप उजळे गुणाने        


 वाढे प्रेम मनातून

माफ करिता चूकीला

आता क्षमा करु त्यांना

विसरुन त्या खेळीला     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract