STORYMIRROR

vaishali vartak

Classics

3  

vaishali vartak

Classics

मृग सरी

मृग सरी

1 min
8

तप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
आला सोसाट्याचा वारा
मृगसरी त्या अंगणी

वाजवित ढोल ताशे 
मेघ राजा बरसला
नृत्य  दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला


चिंब झाली वसुंधरा
आल्या आल्या मृग धारा
ओल्या झाल्या वृक्षवेली
गाणी गात फिरे वारा


मुले नाचती आनंदे
गात गाणी पावसाची
टपटप झेली धारा
माळ दारी  पागोळ्याची

पक्षी उडती मजेत
थेंब    सरींचे झेलीत
बळीराजा आनंदला
पाही शनिवारी खुशीत 

मृगसरी बरसता
मृदगंध   पसरला 
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला



वैशाली वर्तक 
अहमदाबाद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics