गझल-१
गझल-१
कोणत्या माणसा येथ मानू खरा
वाटतो ना कुणी आज येथे बरा
काल होती कशी लाजरी, बावरी
रागिणी जाहली आज का सुंदरा
दात दावायचे, खायचे वेगळे
ओळखावा कसा तो खरा चेहरा
कोण तू कोण मी आज आलो इथे
सांग आता इथे कोणता आसरा
आपले दात ते ओठही आपले
सांगता येत नाही कुणाला जरा
