STORYMIRROR

Pandit Warade

Children Stories Tragedy Inspirational

3  

Pandit Warade

Children Stories Tragedy Inspirational

पाण्याला जाते बाई

पाण्याला जाते बाई

1 min
201


या दुष्काळी दिवसांनी लई कहर केला बाई ।

किती किती गं सांगू आता आमची ही कर्मकहाणी ।।


तापतो किती उन्हाळा अंगाची लाही लाही ।

बसवेना घराच्या आत बाहेरही निघवत नाही ।।


दोन घास सुखाचे खाणे आमुच्या नशिबी नाही ।

शाळेचा रस्ता सुटला मग कैसे शिक्षण बाई? ।।


पोटाची खळगी भरण्या कामावर जावे लागे ।

कामावर सारेच जाता मीच राहू कैसी मागे ।।


वडिलांच्या सोबत गेली कामावर माझी आई ।

मी कुठवर गाऊ आता ही बालपण नवलाई ।।


कशी केली दुष्काळाने चहू कडे पाणी टंचाई ।

घेऊन कटीवर भांडे, मी पाण्याला जाते बाई ।।


Rate this content
Log in