नवे वर्ष (संकल्प)
नवे वर्ष (संकल्प)


संपले जरी जुने वर्ष
सांगून नव्याला गेले
अधुरेच राहिले सारे
संकल्प होते केलेले
दरवर्षी नेहमीप्रमाणे
संकल्प केले जातात
नऊ दिवस नव्याचे
पुन्हा जैसे थे होतात
गतवर्षाचा आढावा
घ्यावा वर्ष संपतांना
नव्या दमाने स्वागत
करा नववर्ष येतांना
वर्ष येते नि वर्ष जाते
आपण जिथल्या तिथे
आपण आपले ठरवावे
काय करावयाचे इथे
प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे
नववर्ष संकल्प हा
वैर संपून जाऊ द्या
मैत्रीस सज्ज रहा