STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

स्त्री तुझा हक्क

स्त्री तुझा हक्क

1 min
41.7K



रांधा, वाढा, उष्टी काढा

नारी जीवनाची व्यथा

चूल, मूल सांभाळणे

एवढीच तिची कथा....१


एक सावित्री जन्मली

आणि किमया घडली

नारी चाकोरी सोडून

घरा बाहेर पडली.....२


तिने शिक्षणाचे दार

नारी साठी केले खुले

घेण्या शिक्षण नारीचे

तिथे चालली पाऊले...३


धडे घेत जीवनाचे

नारी शिकली शिकली

तिच्या हक्क कर्तव्याची

तिला जाणीव जाहली..४


खांदा खांद्याशी लावून

बघा कशी सज्ज झाली

घर दार सांभाळून

पैसे मिळवू लागली..५


नारी भोगदासी नाही

सदा पुजनीय राहे

तिचे स्वतंत्र अस्तित्व

जगी सर्वमान्य आहे..६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational