बालगीत
बालगीत

1 min

258
निसर्ग शोभा बघायला
चला मुलांनो सहलीला ।।धृ।।
फुले गोजिरी गवताची
शोभा वाढवी धरतीची
गंध फुलांचा हुंगायला ।।१।।
तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष किती
फुले, फळे, छाया देती
फळे गोमटी चाखायला ।।२।।
सप्तरंगी तो इंद्रधनू
बघता रोमांचित तनू
निळ्या नभाला पहायला ।।३।।
झरे वाहती खळखळ
तिथे कृमींची वळवळ
त्यांच्या सोबत खेळायला ।।४।।
पक्षी मंजुळ गातात
पशू स्वैर विहरतात
जाऊ तेथे हुंदडायला ।।५।।
शीतल वारा करी दंगा
सरी घाली धांगडधिंगा
पाऊसधारा झेलायला ।।६।।