नदी
नदी


ही खळखळ वाहे नदी तक्रार कधी ना करते ।
किती दूषित केले तरी ना राग कुणाचा धरते ।।
ती वाहत राही नेहमी ठावे न थांबणे तिजला ।
ती कधीच पहात नाही भूप्रदेश कितीसा भिजला ।।
साऱ्या मुलखाची घाण स्वतःच्या सोबत नेते ।
परी प्रेमे सर्वांच्या साठी निर्मळ पाणी ती देते ।।
वाहणे नित्य नेमाने हाच तो नदीचा धर्म ।
ना मुखातून ती वदते केलेले कोणते कर्म ।।
हे तिच्या कडून शिकावे, ना व्यर्थ कधी बोलावे ।
आपुल्या कर्मयोगाने, संतुष्ट इतरांना करावे ।।