किती
किती


किती चुकवावे क्षण,
पण येऊन जाते
नजर भेद ते आकाशी
मन एक होऊन जाते
नव्या हरिनीची आस
जशी फिरते गरगरा
काळे क्षितीजही मग
बरसू लागते
कोणा कळली ही
प्रित श्वांसांची
अबोल प्रित ही
मग डोळे बोलू लागते
पुन्हा होते जाग्रूत
भाव मनात दाटते
शांतता भंगते मनाची
तुझे विचार छेडू लागते
क्लेश दायक ना व्हावी
मनातच रुजावी प्रित
उध्वस्त वाटांनाही मग
चालावे लागते