STORYMIRROR

Sandesh Kardak

Classics

3  

Sandesh Kardak

Classics

प्रिय पत्नी

प्रिय पत्नी

1 min
299

प्रिय पत्नी आज काहीतरी तुझ्यावर लिहावं म्हणतोय 


तू व्यक्त करत नसलेल्या भावनांना 

शब्दात मांडावं म्हणतोय..... 


तुला कदाचित मोठा प्रश्न पडेल मी आज असं का बोलतोय 


कधी नव्हे तें आज अचानक एवढं विचित्र कसकाय वागतोय..... 


मला माहित आहे आता तू तूझ्या कडून काही चुकलंय का म्हणून अगदी गोधळून जाशील


तूझ्या मनात उठलेल्या असंख्य प्रश्नांनी तू कावरी बावरी होशील.... 


दहा वेळा आरशा समोर जावून पदर सावरत टिकली बरोबर लागली का तें पाहशील 


स्वयंपाक घरात धावत जावून आमटीतल मीठ चाखून भाताचं शीत दाबून पोळी करपली का तें पाहशील.....


तेही बरोबर असले का तू लगेच माझे इस्त्रीचे कपडे , घड्याळ , रुमाल , सॉक्स, बूट माझ्या जवळ आणून देशील


मग तू माझ्या रोजच्या गुलामीत असलेल्या कामापैकी काही राहिलंय का म्हणून स्वतःला कोसत बसशील......


पण खरं सांगू का आज तुझं नाही माझचं गणित चुकलं 


आयुष्यभर फक्त तुला मी गृहीतच धरलं....


मी नेहमीच तुला झीडकारत पायातली वहान करून ठेवलं 


तू मात्र संसाराच्या रथाचं चाक होतं मला प्रत्येक वेळी माफ केलं..... 



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Classics