STORYMIRROR

Dr Anjushree Metkar

Romance Classics

4  

Dr Anjushree Metkar

Romance Classics

पालवी

पालवी

1 min
410

हलकेच झुळूक

वसंताची आली

वसुंधरेच्या कानी

गुज सांगून गेली


मखमली पालवी 

धरित्री ही ल्याली

आम्रतरुला मोहोराची

मिठी ती पडली


कोकिळेस मग

गोड कंठ तो फुटला

कुहू कुहू कुजनाने

वनही भरला


पानोपानी नव्या

अंकुरित पालवीची

चराचरात धुंदी

नव्या नवलाईची


निपचित निद्रिस्त कलिकेस

उरी स्वप्न फुलण्याचे पडे

धरित्री काळ्याशार उदरी

हिरवागार बिजांकुर प्रसवली


आसमंत फूलवेलींनी

नाजूकशा बहरला

निळ्याशार नभांगणी

गालिचा हा अंथरला


पुष्करणींच्या सवे

गंधीत हा आसमंत

रानकळ्या ठायी

भूल चांदणगंधीत


निळ्याशार डोहात

अलगुजाचे तरंग

बेभान राधिकेच्या स्वप्नी

सावळ्याची मिठी बंद


सख्यांचा डोळा चुकवत

ओढीने सख्याच्या धावत

कान्हाचे बासुरीस

ऐकूनिया घाली साद


सजली सवरली

ती गौरांगी बाला

सख्याच्या भेटीसाठी

आसुसलेली काया


इथे सख्याच्या

बासरीला बहर

तेथे राधेच्या 

ओठी गहीवर


कशी साधू

तादात्म्यता सहचरा

मोहरुपी संसारी

त्या विखारी नजरा


परमात्म्याची ओढ

मनीच्या सागरा

मोहनरंगी रंगली

बेधुंद ही कनकधरा


राधेश्यामाच्या संगमी

अवचित बहरले

चैत्र पालवीचे गुज

धरेवरी उमटले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance