आक्रोश गहिवरला
आक्रोश गहिवरला


आक्रोश गहिवरला.....
असा मी काय गुन्हा केला?
बळजोरीच्या प्रितीला
नकार मी दिधला.
ध्यास होता मनी
व्हावे उतराई कष्टूनि
मायबाप बंधू कारणी
कुटूंबियास आधारूनि||
मी नारी न अबला
ओळखिने घात केला
भ्याडा तू नकार ना पचविला
छलकपटे गळा कापला||
हिंगणघाट ते स्मशानघाट
का केलीस वाताहात?
तव दूष्कृत्यांचा हा घट
हाय,कधी फुटेल का जनक्षोभात?
पेटत्या ज्वालांच्या वलयात केले मी मृत्यूशी दोन हा
त
कणरवाने झिजल्या पिंडास
अखेर त्यजिले मी या देहास||
नराधमा तुझी न आता खैर
आप्तस्वकीय होवोत तुज गैर
फरपटोनी फेकतिल का तुज भक्ष्यस्थानी वैश्वानर?
मग संपेल का तव क्रोर्य धैर्य?
चितेवरील मम कायेच्या अंगारे
पेटतिल का जनक्षोभ निखारे?
तुजसम म्हैशासुरा वधतिल ते दबंग
तव दुष्कृत्यांचा जळेल मग दंभ||
आतुरले मी त्या क्षणा
तव पापकृत्यांचा दणदणा
विरतिल तव खाणाखुणा
मिळेल चिरशांती या मना||