STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

तो पाऊस वेडा झाला

तो पाऊस वेडा झाला

1 min
217

तो पाऊस वेडा झाला

रिमझिम बरसला कधी

थुईथुई नाचला वेळीअवेळी

गत त्याची पुढाऱ्यागत झाली


तो पाऊस वेडा झाला

गरजला जरी वाघ , सिंहापरी

तो झाला भलताच लहरी

डरकाळी त्याची फोल निघाली


तो पाऊस वेडा झाला

जगण्यात खोडा झाला

आला गेला स्व मर्जीने

जगण्याचा वांधा झाला


तो पाऊस वेडा झाला

येण्यास विसरला आधी

घनघोर बरसला कधी

असून अडचण नसून खोळंबा


तो पाऊस वेडा झाला

येऊन बेफाम झाला

होते जे काही सारे

महापुरात घेऊनि गेला


तो पाऊस वेडा झाला

येऊनही राडाच केला

ओढे, नद्या नाले दुथडी

हिरवे स्वप्न पुन्हा भंगले


तो पाऊस वेडा झाला

आला गेला काय फायदा ?

बळीराजाच्या भाळी

दुःख वेदनाच देऊन गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy