Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Murari Deshpande

Inspirational Tragedy


4.6  

Murari Deshpande

Inspirational Tragedy


एस.टी.ची व्यथा

एस.टी.ची व्यथा

1 min 21K 1 min 21K

एसटी म्हणाली माझ्यापाशी

आहेत अनुभव रग्गड

कितीतरी आंदोलनात

माझ्यावरच पहिला दगड

पिसाट होऊन धावतात

येतात माझ्या अंगावर

भरवसा तरी नेमका आता

ठेवू कोणत्या रंगावर

कधी उभी पेटवतात

कधी काचेवरच भागते

भर रस्त्यात वस्त्रहरण

सहन करावे लागते

जखम असेल मामुली

तर मलमपट्टी लावते

पुन्हा नव्या दमाने

सेवेसाठी धावते

मी असहाय म्हणूनच

सोकावलेत सारे षंढ

माझ्या मनातला ज्वालामुखी

भविष्यात करेल बंड

तुमच्याच आया बहिणींना

लेकरांना नेते मजेने  

तुम्ही मात्र परतफेड

करता नेहमी सजेने

तुमच्या भंपक ‘मर्दानगी’ची

किळस आता यायला लागली

तुमच्यामुळे पोरं सोरंही

हाती दगड घ्यायला लागली  

वस्ती गाव शहरांपर्यंत

पोचवा माझी व्यथा

हीच विनंती शेवटची

समजून घ्यावे आता

सांगतोय माझ्यावर पडलेला

दगड अन पेटता बोळा

दंगेखोर पकडून सारेच

भरपाई करा गोळा


Rate this content
Log in

More marathi poem from Murari Deshpande

Similar marathi poem from Inspirational