शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक
रायगडावर शिवतेजाला अभिषेक झाला
नमन कराया हात जोडूनी सूर्यदेव आला
पराक्रमाची शर्थ करोनी राज्य उभे केले
स्वप्न मनातील निर्धाराने तडीसही नेले
सुखी कराया रयत आपली जीवन वेचीयले
दुष्ट, कुटील अन कपटी शत्रू रणात ठेचीयले
देव, धर्म अन न्याय-नीतिचे जोपासून तत्त्व
जागे केले मनामनातील स्वाभिमान स्वत्व
tyle="color: rgb(34, 34, 34);">
युगपुरूष हे ठरले राजे जगी एकमेव
विश्वाला ऊर्जा देणारी तेजोमय ठेव
हृदयामध्ये कोट्यावधींच्या पानच सोन्याचे
भाग्य लाभले रयतेलाही शिवमय होण्याचे
जगास देई दिशा आजही अभेद्य शिवनीति
छत्रपती शिवरायांची मी वर्णू किती कीर्ती
जोवर असतील अवकाशी या सूर्य चंद्र तारे
गड किल्ले अन पर्वत गातील पोवाडे सारे