लॉकडाऊन
लॉकडाऊन

1 min

12K
लॉकडाऊनचा पाचवा अध्याय, होणार की काय सुरू
पोट विचारतेय हाताला, कुठवर दम धरू
समस्यांची मालिका घेऊन, विषाणू घेतोय सूड
आपण मात्र लढत राहू, निश्चय करून दृढ
शंभर वर्षातला अजब आजार, बुचकळ्यात पडलंय विश्व
बांधून ठेवावे लागत आहेत, चौखूर उधळणारे अश्व
गरीब-श्रीमंत सर्वांनाच बाधतो, धर्मही सारखेच सर्व
दाखवले जगाला कोरोनानेच, खरेखुरे समतेचे पर्व
एकच गोष्ट खरी जगात, विषाणूने केले स्पष्ट
मानवताधर्म अन मानवजात वाचवायला घ्यावेत कष्ट