घराघरातील'गृहमंत्र्यां'नी
घराघरातील'गृहमंत्र्यां'नी
1 min
335
घराघरातील'गृहमंत्र्यां'नी
उचलावीत कडक पावले
त्याच्याशिवाय घरात
थांबणार नाहीत बावळे
वेळप्रसंगी ठेवणीतला
आवाज काढावा प्रभावी
काहीही करून फेरफटक्याची
उबळ वेळीच दाबावी
तरुण पोरा पोरींनो
ऐका नक्की आईचं
नजर चुकवून सटकणं
सपशेल चूक आणि घाईचं
गोजिरवाण्या घरात
विषाणू नकोय ना घुसायला
म्हणून आपण कोणीही
फिरताना नकोच दिसायला
डॉकटर्स आणि पोलिसांना
लढण्यास देऊ या बळ
म्हणून विनवतो मुरारी
सोसू या थोडी कळ
