वर्तमानाचे अभंग - आरोग्याचे
वर्तमानाचे अभंग - आरोग्याचे
शक्य आहे सारे | निर्धार शक्तीने |
प्रत्येक व्यक्तीने| पाळावे हे ||
टपला विषाणू | वेळ नाही बरी |
आपुल्याच घरी| थांबू सारे||
कुठेसुद्धा गर्दी | नको अजिबात|
करण्यास मात | रोगावर ||
भल्यासाठी सर्व| पाळू या आदेश |
सुंदर हा देश| वाचविण्या||
असते सदैव| हक्काचीच जाण|
कर्तव्याचे भान | बाळगू या ||
जोडीतो मुरारी | सर्वांपुढे हात|
देण्यासाठी साथ | लढ्यास या||
मानवाचा लढा | मानवाच्या साठी |
उभे त्याच्या पाठी | राहू सारे ||
जिंकू ही लढाई | मिळोनिया सर्व|
विजयाचे पर्व | आनंदाचे ||