रसिका तुझ्याचसाठी
रसिका तुझ्याचसाठी
1 min
225
रसिकावीण ती कसली मैफल
रसिकांवीण सारेच सुने
रसिकांच्या हृदयी घर मिळता
प्रेमाला मग काय उणे
मुक्त मनाने रसिक जेव्हा
देई मजला खुलून दाद
अपार मिळते समाधान अन्
तृप्तीचा दरवळतो स्वाद