एका अदृश्य विषाणूने
एका अदृश्य विषाणूने
1 min
384
खुजेपणाची जाणीव मानवाला
व्हावी आतातरी
एका अदृश्य विषाणूने
विश्वाला बसविले घरी
अतिप्रगत ग्लोबल विश्वाच्या
नशिबात ग्लोबल रोग
जागतिक वर्चस्वासाठी
परस्परांवर विषप्रयोग
मानवतेचे शत्रूही
निघाले साम्यवादी
घातकी चीन चालवतोय
राक्षसांची गादी
आम्हीच राज्य करू पृथ्वीवर
हा तर मोठा भ्रम
उत्पत्ती स्थिती अन् लयाचा
चुकत नसतो क्रम
