STORYMIRROR

Murari Deshpande

Others

3  

Murari Deshpande

Others

दिवे पेटायच्या अगोदरच

दिवे पेटायच्या अगोदरच

1 min
11.4K

दिवे पेटायच्या अगोदरच

राजकारण मात्र पेटले

तऱ्हेतऱ्हेचे नमुने

सोशल मीडियावर भेटले


दिवे लावण्या मागची भावना

समजावून घ्यायला वेळ नाही

राजकारणा इतका गलिच्छ

दुसरा कोणताही खेळ नाही


अकलेचे तारे तोडण्यासाठी

एकाची दुसऱ्यावर कडी आहे

तोल सांभाळा बाबांनो

ही सत्वपरीक्षेची घडी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन