Murari Deshpande

Inspirational

3  

Murari Deshpande

Inspirational

मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर

मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर

1 min
11.7K


अष्टभुजा देवीला स्मरूनी , शपथ घेतली मोठी

चला तोडू या सर्व शृंखला , समर्थ भाषा ओठी

अभिनव भारत हेच मानले , तुम्ही सदा गणगोत

कोट्यावधी युवकांच्या मनीचे , तुम्ही प्रेरणास्त्रोत

भोगूनी तुम्ही मरण यातना , दिला अमर जो लढा

मुजोर इंग्रज हबकून गेला , असाच भक्कम धडा

काळकोठडी अंदमानची , केलीत तुम्ही पवित्र

दगडाच्या भिंतीत ,कोरले स्वतंत्रतेचे चित्र

समुद्रासही धडकी भरली , पाहून तुमची छाती

तुमच्या स्पर्शे पुलकित झाली , भारतभूची माती

हसत भोगले देशासाठी , तुम्हीच काळे पाणी

तरुणांनाही स्फूर्ती ठरली , तुमची अमोघ वाणी

रत्नागिरीच्या राम मंदिरी , केलीत प्रेमळ क्रांती

पतित पावन करून दिधली , लक्ष मनांना शांती

बंदूक येथे हतबल झाली , पाहुनी तव लेखणी

जीवनयात्रा यज्ञकुंड अन , पारदर्शी देखणी

विचार बैठक भक्कम तुमची , उपमा नाही धीरा

पुन्हा पुन्हा मी झुकतो चरणी , स्वातंत्र्याच्या वीरा !!


Rate this content
Log in