STORYMIRROR

नेहा खांदवे

Inspirational

4.8  

नेहा खांदवे

Inspirational

पाळी

पाळी

1 min
45.9K


कळ्या गांगरून जातात

भेदरतात,बावरतात,...

सुरवंटाची फुलपाखरं होतात कधी...

कळतच नाही...

फडकी रक्ताने माखू लागतात..तेव्हा

आज्जी हात जोडून

गच्च डोळे मिटून घेते

देवघरात....

न्हानी घरातील स्वतंत्रता

हरवून जाते ...

आणि बापाची कूस

परकी होऊन जाते

कळतसुद्धा नाही...

हळदीकुंकवाला नकार देताना आई म्हणायची

अडचण आहे

जमणार नाही...

या अडचणीचा खरा अर्थ

उमगु लागतो

आणि छातीवरच्या सौन्दर्याची खरी किंमत कळत जाते...

शिवताशिवत कळू लागते

आणि मंदिराचे प्रवेशद्वार

बंद होते....

नकार देतातच कसे देव

इथले मला...?

झाड मोठं झालं

या वाक्याचा अर्थ समजू लागतो तेव्हा....

निसर्गाचा हा स्त्री देहातला

महोत्सव सुंदर वाटला पाहिजे ना...?

प्रत्येक दगडातून हुंकार येतातच

शापित अहिल्याचें...

बघा कधी ऐकता आले तर....

आई होण्याचा सोहळा कमी

आणि बाप होण्याचा आनंद साजरा करणाऱ्यांनो...

महिन्यातील पाच दिवस तुमच्या वाट्याला आले असते तर...

कदाचित नजरा वखवखल्या नसत्या....


Rate this content
Log in

More marathi poem from नेहा खांदवे

Similar marathi poem from Inspirational