झाकली मूठ सव्वालाखाची ...
झाकली मूठ सव्वालाखाची ...
माझं असू दे माझ्या जवळ...
तुझं असू दे तुझ्या जवळ
झाकली मूठ सव्वालाखाची ...
नाहक वळवळ हवी कशाला ?
माझं काय जगेन कसाही ...
तुम्हाला मी हि नकोच तसाही
झाकली मूठ सव्वालाखाची ..
तुमचं तुम्हाला लखलाभ...
ज्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान टेकवली ...
त्यांनी कुरघोडी केली , चांगलीच जिरवली
सगळेच चोर , आहेच थोर , दाद तरी कोणाकडे मागावी ?
खाणारे तेच , गाणारे तेच, झाकली मूठ सव्वालाखाची ...
कुंपणाने शेतं खाल्ली ,खरं असलं तरी...
आपणच तर दिली तिजोरीची चावी
आता काय बघत बसावं खुशाल तमाशा
म्हणतात ना झाकली मूठ सव्वालाखाची ...