STORYMIRROR

Surykant Kamble

Inspirational

3  

Surykant Kamble

Inspirational

मासिक पाळी

मासिक पाळी

1 min
801

मासिक पाळी दिवसाच्या 

आज व्हाॅट्सअप आणि 

फेसबुकवर शुभेच्छा देतात सारे

पण कोणालाही नसते

भान त्या दिवसाचे खरे


मासिक पाळीच्या दिवशी 

तुम्ही करा तिला मदत

सगळे दुःख विसरून देईल

तुम्हाला ती स्वानंद


मासिक पाळी हा 

नाही हो आजार

तुमच्या वंशाच्या दिव्याला

आहे तिचाच आधार


मासिक पाळीमुळे 

तुमचा देव बाटतो

मग त्या स्त्रियांच्या

हातातील दान कसा घेतो


मासिक पाळीमुळे

तुमचा वंश हा वाढतो

पण तुझ्यातला पुरूषी 

अहंकार तुला नाही थांबवितो


मासिक पाळीच्या 

दिवशी करा तिचे लाड 

आणि पुरवा तिचे हट्ट

तुम्हाला मारेल मिठ्ठी आणि

पकडेल तुमचा हात घट्ट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational