भाळी लिहलेले स्वातंत्र्य
भाळी लिहलेले स्वातंत्र्य


आयुष्यभर गटारातील घाण काढून
आम्हाला कसलं आलंय स्वातंत्र्य
जीवन जगत आलो आम्ही
भोगत आहोत अजूनही पारतंत्र्य
घाण काढून लाखो पिढ्या मसणात
गेल्या आम्हाला कसलं आलंय स्वातंत्र्य
सरकारी नोकरी म्हणून गुलामीच जीणं
जगतोय हेच आमच्या अंगी पारतंत्र्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
या चिखलातून बाहेर काढले
बौद्ध धम्म स्विकारुन आम्ही
मनुस्मृतीला मातीत गाडले
या मनुवादी बुरसटलेल्या व्यवस्थेत
कसा करावा आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा
भारतीय स्वातंत्र्य दिनाकडे असतात
संपूर्ण जगाच्या कुतूहलतेने नजरा