STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Fantasy

4  

Tanvi Raut-Mhatre

Fantasy

बाबा म्हणजे बाबा असतो

बाबा म्हणजे बाबा असतो

1 min
29K


बाबा म्हणजे बाबा असतो

जो नऊ महिने आपल्या बाळाची

आतुरतेने वाट बघतो,

जो आपल्या मुलांसाठी

आयुष्यभर कष्ट करतो,

तो म्हणजे बाबा असतो.खरंच...

काही हवं असेल आणि बाबांना

सांगितलं तर ती गोष्ट लवकरात लवकर आणण्यासाठी धडपडणार बाबाच असतो,

खरंच, बाबा म्हणजे बाबा असतो.....

आपल्या मुलीला चांगल

सासर मिळावं म्हणून धडपणारा

पण बाबाच असतो,

खरंच बाबा म्हणजे बाबा असतो...

पण तोच बाबा मुलीचा

हात परक्याच्या हातात

देताना हुंदके देऊन रडतो,

खरंच बाबा म्हणजे बाबा असतो.....

पण तोच बाबा आपल्या मुलीला

सुखात बघून खूप सुखावतो

खरंच बाबा म्हणजे बाबा असतो....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy