STORYMIRROR

Rohini Kamble

Classics Fantasy Others

4  

Rohini Kamble

Classics Fantasy Others

का केलेस प्रेम

का केलेस प्रेम

1 min
295

का केलेस प्रेम?

जर तुला मला नाकारायचे होते,

प्रेमाच्या प्रवासावर अर्ध्यावरी सोडायचे होते,


नकळत गुंतले आपले हृदय एकमेकांत,

कशी सोडली तू माझी साथ एका क्षणात,

स्वप्नाच्या दुनियेत रंगूनी गेलो आपण,


तुझे निर्मळ डोळेच होते माझ्या मनाचा दर्पण,

जीवापाड प्रेम माझे तुला का नाही समजले,

शेवटी यालाच म्हणतात जीवन माझे मलाच उमगले,


मिटतील अलगद जेव्हा माझे दोन्ही नयन,

काळे ढग दाटून येतील तेव्हा होईल विचलित तुझे मन,

सुरु होईल तुझ्या निळशार डोळ्यात अश्रूची धार,


नको करू जिवलगा तू माझा स्वीकार,

प्रेमाचे युद्ध हारले मी आता घेतली माघार,

आठवण येता माझी डोकव तुझ्या हृदयाच्या डोहात,

अजूनही तिथेच असेन मी प्रेमवेडी एका क्षणिक मोहात


क्रमश:



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics