STORYMIRROR

Rohini Kamble

Romance Fantasy Others

3  

Rohini Kamble

Romance Fantasy Others

तूझे हृदय माझे घर

तूझे हृदय माझे घर

1 min
222

नाव तुझे हळूच गुणगुणता मनामध्ये, 

नवे पान अलगद उघडले काळजामध्ये, 

पाहता तुला गुंतले माझे भाबडे हृदय तूज्यात, 

मनी लागे भेटीची ओढ झूरतो तूज्या विरहात, 

तू कधी वाटे मंद गार वाऱ्याच्या झूळूकाप्रमाणे एका क्षणाला, 

तर कधी सोनचाफ्याच्या सुवासाप्रमाणे हवीहवीशी वाटणारी मनाला, 

मी समुद्र तू किनारा, 

मी धरणी तू आसमंत सारा, 

मी गीत तू‌‌ बोल, 

मी संगितातले सप्तस्वर तू सुरमयी ताल, 

तुझी आस आणि तुझाच ध्यास, 

वेळी अवेळी होणारा तू गोड आभास, 

मी चांदवा तू टिमटिमणारी चांदणी, 

नियती तू आणि तूच माझी अर्धांगिणी, 

मी चिंब पावसाची ओली रात्र तू श्रावणातील रिमझिम बरसणारी सरी, 

तू जणू देवाने मजसाठी स्वर्गातून पाठवलेली सुंदर परी, 

मी पहिला पाऊस तू मनाला मोहणारा मातिचा सुगंध, 

न तुटणारे साता जन्माचे आपले अतूट रेशमी बंध,  

प्रेम बावरी तू माझी राधा होशील ना, 

स्वप्नाच्या दुनियेत एकदा मला भेटशील ना, 

किमया तू‌ अशी केलीस माज्या मनावर, 

तूझेच नाव मी कायमचे कोरले हृदयावर, 

प्रेम माझे अथांग सागराप्रमाणे कळॆल का तूझे तूला, 

कसे सांगू मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत तुज्या हृदयात रहायचे आहे मला..

(कैसे मे कहू तुझसे, रहना है तेरे दिल मे)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance