तुझे अधिराज्य हृदयावर
तुझे अधिराज्य हृदयावर
निळॆ सावळॆ मेघ दाटून येता,
हृदय स्वप्नाच्या डोहात हिंदोळॆ घेतो,
मिटता माझे खटयाळ डोळॆ तूझाच भास होतो,
सावरते स्वताला कसे सांगू मनातील कोडे तुला?
माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त ठाऊक तुला,
न सांगता मनातील भाव समजेल का तुला?
आतूरता आपल्या मिलनाची सदैव मला,
सांज वेळी तुझ्या भेटीची आस मनी लागे हुरहुर,
तुझ्या विचाराने मनात माजतात माझ्या असंख्य काहूर,
समुद्राप्रमाणे निळशार आणि गहिरे तूझे डोळॆ,
आयुष्यभर त्यांत सामवायला तयार माझे काळीज भोळॆ,
पाहता तुला भान हरपते असते तूझीच गोड धुंदी,
का मी दर वेळी शोधते तुझ्याशी बोलण्याची संधी?
भेटता तू शब्द माझे स्वताशी लपंडाव खेळतात,
गूपीत तूला सांगायला प्रथम स्वताला न्याहाळतात,
माझे मज उमगले नीत चाहूल तुझीच मनात,
मन माझे रंगबिरंगी फूलपाखरू जसे बागडे रानात,
प्रेम माझे कसे सांगू शब्दांत मला समजेना,
तूज्यावाचून जिवाला चैन काही पडेना,
अबोल माझे प्रेम हे येईल का भरतीला?
नवीन उजाळा मिळॆल का जुन्या भेटीला?
मी नदी तू सागर शेवटी तूलाच येऊन भेटणे,
तू अंबर मी मूक्त पाखरू जसे गगनात संचारणे,
मी सुमन तू सुगंध, मी धागा तू रेशमी बंध,
आयूष्यभरासाठी तुझ्या मनात स्थिरावली,
जणू राधा ही बावरी प्रेम रंगात रंगली,
जादू अशी केलीस या वेड्या मनावर,
आजपासून तुझेच अधिराज्य या हृदयावर

