तूझाच चेहरा जिव्हारी ❤️
तूझाच चेहरा जिव्हारी ❤️
उत्सूक मी होण्यास तुझ्या काळ्याभोर मृगनयनी समाविष्ट..
मैत्रीच्या पलीकडे व प्रेमाच्या अलीकडे असे आपुले नाते घनिष्ट..
मखमली कुंतल तुझे जसे काळॆ गडद आभाळ..
लाखात एक तुझी सुंदरता पाहून झालो मी घायाळ..
गूळासारख्या तुझ्या गोड शब्दांत विरघळण्यास मी आतूर..
राजकुमारीप्रमाणे रूप तुझे चेहऱ्यावर तेजाचे नूर..
पाहून तूझा निरागस व गोड चेहरा चंद्रही लाजला..
घे उंच भरारी तुजसाठी आकाशी झोपाळा सजला..
सुंदर तुझे लाजणे जणू फूलाची उमलणारी नाजूक कळी..
लागला असा तुझा लळा तुझ्या प्रीतीचा टीळा माझ्या कपाळी..
असतो तुझ्या विचारात गुंग लागत नाही मनाचा थांगपत्ता..
सांग तू मिळॆल का तुझ्या हृदयाला माझ्या हृदयाचा पत्ता..
तू थोडीशी खोडकर कधी वाटे थोडी बावरी..
कसे तुला समजवू तुझा चेहरा मी कोरलाय जिव्हारी..

