अष्टाक्षरी....
अष्टाक्षरी....


सांग गुपित कानात
लपलयं जे मनात
कैद नको काळजात
आसुसल्या नयनात
शब्द होऊदे मोकळे
सजलेले स्वप्न ओले
ओठातल्या पाकळीत
अडलेले प्रीत झुले
नको कोंडूस हृदयी
भाव नाजूक कोवळे
सखे हे प्रेमडोहाळे
आहे सुखाचे सोहळे
सांग सजनी खुशाल
काय तूझ्या अंतरात
खेळतय जे श्वासात
टाक माझ्या पदरात
मन नाही था-यावर
बघ सांगतो चेहरा
मला बघताच का ग,..
होतो सांग गोरामोरा
काय म्हणेल जमाना
सोड आता हा बहाना
कृष्ण राधेचा दिवाना
सुर बासुरीचा जुना