ती
ती


नको श्रुंगार तुझा
नको ते सजणे,
लाजलीस बघुनी मला
हेच तुझे दागिणे.....
बघता क्षणी मला
खळी फुलली गालाची,
अंग शहारले, जणू
कळी उमले निशिगंधाची.....
हा गंध सखे गं
तुझ्याच कस्तुरीचा,
मी मुग्ध होऊनि
धावा करतो प्रीतीचा.....
अंबकी तेज तुझ्या
जणु कौमुदी नभातली,
भावे तुझा साज सखे
अन सादगी ही मनातली....