स्वपणची लाजवंती
स्वपणची लाजवंती
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार,
माझ्या स्वपनाची लाजवंती कधी आकार घेणार.
तुझी आकृती भर दिवसा डोळ्यात झळकते,
तुझ्या आभासाने मन माझे कसे डोलवते.
तुझ्या स्वागता साठी निसर्ग कसा सजतो,
बागे मधली रंगी-बिरंगी फुले कसे उगवते.
आगळे- वेगळे भवरे फुला मधे कसे रमते,
ते पाहुन स्वपनातील लाजवंती डोळ्या समोर दिसते.
बागेतले रंग-बिरंगी फुला मध्ये तुझे रुप झळकते,
स्वयम भवरा होउनी माझे वास्तव्य त्यात दिसते.
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार,
माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणार.
सकाळचे कोवळे किरण मला स्पर्श करते,
जनु तुच स्पर्श करुन गेल्या सारखे भासते.
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार,
माझ्या स्वपनाची लाजवंती कधी साकार होणार.
वायु वेगाने तुझी जान दिवसा मनाला धडकते,
आकाशातील चंद्र बघुनी तुझे भान रात्री होते.
तुझ्या आगमनाची चाहुल मला भासते,
ह्रुदयाचे आंगन स्वागतासाठी नेहमीच सज्ज असते.
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार,
माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणार.