STORYMIRROR

Arun Gode

Romance

4  

Arun Gode

Romance

रंगपंचमी.

रंगपंचमी.

1 min
61

                            रंगपंचमी. 

तुझ्या गुलाबी-गुलाबी गालामध्ये,

गुलाबी गुलालाची अनोखी ठिपकी. 

त्याहून सुंदर तुझी रंगी-बिरंगी खळी,

रंगाने लाल-पिवळी झाली तुझी साडी. 


वरुण तुझे मटकणे मला वाटते लय भारी,

रंगपंचमीच्या रंगात सातरंगी साक्षात जसी परी.

बिना पावसाने इन्द्रधनुष्यची छटा जसी जमिनीवरी,

नभातील इन्द्र धनुष्य अवतरला जणू तुझ्याच रूपी. 

 

काळे-भोर, दाट-लांब तुझे केस वाराणे उडतात,

जसे नभातील घनघोर, काळे-भोर मेघ बरसतात. 

आकाशातील चमकणाऱ्या विजे सारखी तुझी छटा, 

मनातील माझे भाव पक्षासारखे आकाशात उडतात 



तुझे लटके ,झटके व ठुमके डोळ्यात धकधकते,

मनाचा चंचल भंवरा तुझ्या खळीमध्ये अडकते.  

बघुन तुझे बहुरंगी मनोहर नृत्य डोळ्यात सलते,

माझे अंग-अंग थिरकते आणी मन बेभान डोलते.    


लाल-लाल साडीमध्ये दिसते तू चिडलेली वाघिणी,     

अशीच असावी माझी तुझ्या सारखी निडर रागिणी. 

बघून तुझी साधी,सरळ,प्रेमळ आणी मोहक राहणी,

तुझ्याच सारखी असावी मनमोहिणी माझी अर्धांगीणी. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance