स्वराज्य योध्दे.
स्वराज्य योध्दे.
स्वराज्य योध्दे.
शिवाजीच्या सेनेत अनेक धाडसी आणि शूरवीर योद्धा,
शिवाजीवर प्रेम करणारे मातीतील मावळे महान योद्धा.
होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण झाली प्रसिध्द,
अफजल खानचा वार झेलयाला होता जीवा अग्रणी योद्धा.
एसाजीची तलवार व बाजीची सुविख्यात शूरगाथा,
65 किलो वजनी तलवारीने शत्रूवर करे तो वार.
किल्लेदार बाजी प्रभूचे धाडस आणी शौर्य महान,
पावन खिंडीतच शत्रूला रोखले देवून आपले प्राण.
प्राणाची आहुती देवून वाचले शिवरायांचे प्राण,
अवघ्या दोनहजार सैन्याशी प्रभुने वाचवल गड.
गनिमी युध्दतंत्र होते मावळ्यांचे शस्त्र महान,
गड आला पण सिंह गेला,शिवाजीने केले कथन.
सिंहगड जिंकला,आदी लगीन कोंडाण्याचे घोषणा करुन,
जिंकला प्रथम सिंहगड आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलून.
तुटलेल्या हातानेच तानाजीने जिंकला सिंहगड प्राण देवून,
स्वराज्यासाठी संसारीक मोह त्यागून निभवले दिलेले वचन.
शिवाजीच्या सेवेत अनेक कुशल घोडेस्वार,
संताजी जवळच होता अनोखा तो जादूमंतर.
अवघ्या आठ तासात संताजी वायु गतीने,
दिल्ली ते पुणे कापायाचा नागमोडी अंतर.
शत्रूच्या छावणीत धनाजी असा घूसतो,
व तो शत्रूचा कापतों जागेवरच कळस.
धनाजी छावणीत सैतानी वेगाने घुसतो,
शत्रूला कळण्याच्या आधीच ठार करतो.
शिवाजीचे शूरवीर पुत्र छावा संभाजी,
ठाण्या वाघाला एकटाच उभा पाडतो.
मेहुणा हंबीरराव होते खंबीर, पराक्रमी सेनापती,
नेताजी पाळकर शिवाचे सर नौबत महापराक्रमी.
बहिर्जी नाईक प्रमुख निष्ठावान गुप्त हेर,
शत्रूची माहिती युध्दरत सेनेला अचूक फार.
शत्रूच्या गोटात शिरून करायचे गुप्त हेरगिरी,
शिवाजी आपल्या सेनेचे नेतृत्व करतो जीवापार.
शिवा शक्तिच्या जागी युक्तीचा करतो वापर,
बलाढ्य सेनेला करतो पराभूत आणी हद्दपार.
स्वराज्याची गड किल्लाची संख्या तीनशे पार,
जनतेचे कल्याण व सुरक्षेची कार्य करतो अपार.
