STORYMIRROR

Sushama Raut

Classics

4  

Sushama Raut

Classics

भारूड

भारूड

1 min
686

अगं अगं अगं...

काय झालं बया...


काय झालं काही कळतच नाही..

मोबाइल विना चैन पडतच नाही,

जवळ नसेल तर मन रमतच नाही…..


अगं अगं अगं...

काय झालं बया...

काय झालं काही कळतच नाही..

या व्यसनाने पार जखडून टाकले,

जीवनाचे गणितच बदलून टाकले….


अगं अगं अगं...

काय झालं बया...

काय झालं काही कळतच नाही..

काय करू काही सुचतच नाही,

या व्यसनाला काही उताराचा नाही….


अगं अगं अगं...

काय झालं बया...

काय झालं काही कळतच नाही..

चालण्या-फिरण्यात रस उरलाच नाही,

रात्री झोपावेसे सुद्धा वाटत नाही….


अगं अगं अगं...

काय झालं बया...

काय झालं काही कळतच नाही..

मोबाइल खरंच जादूगर आहे,

त्याच्याशिवाय जगणे अशक्यच आहे….


अगं अगं अगं...

काय झालं बया...

काय करायचे आता उमगले ग बया….


जमिनीत मोबाइल गाडून टाका,

समुद्रात त्याचे विसर्जन करा,

होळीत त्याला पेटवून द्या,

विळख्यातून त्याच्या मुक्त व्हा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics