Anil Date

Classics Inspirational


5.0  

Anil Date

Classics Inspirational


सावित्री मा

सावित्री मा

1 min 20.9K 1 min 20.9K

हे सावित्री मा, हे सावित्री मा

उपेक्षितांची विद्यादात्री मा ॥ धृ ॥


विद्येचे डोळे तूं आम्हा दिले

शिक्षणाचे दूध आम्ही पिले

तुझ्या कृपेने गेल्या निघूनी

अज्ञानाच्या ह्या काळरात्री मा ॥ १ ॥


तूं ज्योतिबांची सावली झाली

आम्हा दीनांची माऊली झाली

अपमानाचे अश्रू गिळूनी

तूं दिली ज्ञानाची गंगोत्री मा ॥ २ ॥


अक्षरदेवी शब्दांची माता

लेखनीने आले बळ हाता

मोकळे केले विद्येचे द्वार

तूं अमुची शिक्षणयात्री मा ॥ ३ ॥


Rate this content
Log in

More marathi poem from Anil Date

Similar marathi poem from Classics