चंद्रकोर प्रेमाची
चंद्रकोर प्रेमाची
ब्रम्हांडातल्या नभीची
ही चंद्रकोर प्रेमाची
वाटिकेत या मनाच्या
ही चंद्रकोर सुखाची......
उजळे क्षितीज माझे
विशाल या आकाशाचे
दिव्य ही प्रकाश आभा
निशाणी ही उत्कर्षाची......
चंद्रकोरीच्या समवेत
चटक चांदण्या प्रेमाची
सुर्य ही देतोया ग्वाही
नांदी सुखी जीवनाची......
अंगणात भावणांच्या
जमते मैफल चांदण्याची
ओंजळीत आज माझ्या
ही पुष्पे संकल्पनेची....
सारे पांग फेडिले मी
संघर्षात लढाईची
पावती मिळाली मज
चंद्रमौळी या तृप्तीची.....