STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Tragedy

स्त्री तुझा हक्क

स्त्री तुझा हक्क

1 min
29.1K


जाहीर कां करत नाहीस ग

सखी तू कर विद्रोह मनस्वी

भोग भोगू नकोस तू जीवंतपणी

स्त्री तुझा हक्क सदा सर्वस्वी।।


स्त्रीयांचे अस्तित्व टिकविण्या

ज्वलंत ज्योत घे तू हातात

ही ज्योती जाळूनी सुमेधा

पसरव या पुर्ण त्रिभूवनात।।

युक्तीने अन् शक्तीने दाखवी

आपली चुनूक संसारपथावर

कर मनापासून निग्रह अन

रचूनी वीर गाथा कर्तृत्वावर ।।


सक्षंम होवूनी स्वबळावरती

देती उद्योग नवनिर्मितीचे वाण

स्त्री वीणा घर स्मशानासमं

स्त्री तुझा हक्क आहे ग महान।।


स्त्रीभ्रूण हत्येचा निषेध कर

मिळूनी अन ठणकावूनी

समस्त स्त्रीया साक्षर करण्या

अस्मितेची गाठ ठेव मारूनी।।


स्त्री तू अबला नव्हे आहे सबला

लक्ष्मीबाई मॉ जीजाउचा मान

सावित्रीबाई,अहिल्याबाईची लेक

स्त्री तुझ्या कार्याचा सर्वां अभिमान।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy